चंद्रपूर येथे पारधी समाजाच्या विकासा संदर्भात प्रकल्प अधिकारी कार्यालयात आढावा सभा संपन्न 

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.20 मार्च) :- पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या दालनात प्रकल्प कार्यालय चिमूर व चंद्रपूर यांच्या क्षेत्रातील पारधी समाजाच्या विकासा संदर्भात आढावा सभा प्रकल्प अधिकारी श्री विकास राचेलवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

पारधी समाजाला शासनाच्या सोयी सुविधा मिळाव्या, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, या मुलभूत गरजा पासून वंचित असल्याने समाजाचा विकास व्हावा यासाठी आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांनी शासनाकडे, तसेच आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला होता, याची दखल घेत नागपूर आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर चे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी प्रकल्प कार्यालयात आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली , या सभेला संबोधित करताना प्रकल्प अधिकारी म्हणाले येणाऱ्या पूढील आर्थीक वर्षात पारधी समाजासाठी,पारधी विकास आराखड्यात विविध योजना ,यात, ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजना,

शबरी घरकुल योजना,न्यक्लीएटस बजेट योजनेतुन ,बटेर तितर पालन , कोंबडी पालन, तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसायासाठी विशेष योजना, जिल्ह्यातील खाजगी तसेच निमशासकीय कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पञ देणार, व विविध योजना कार्यान्वित करण्यात येणार असे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, सभेला आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे,एकात्मिक आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी चिमुर श्री मॅक डुले, चंद्रपूर चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी देविदास टिंगुस्ले, आदिवासी विकास निरिक्षक अमोल नवलकार, सचिन आष्टणकर, कार्यकर्ते गजानन पवार व समाज बांधवांची उपस्थिती होती.

Share News

More From Author

जीवन वाचविण्यासाठी रक्तदानाची भूमिका महत्त्वाची…विरेंद्र सिंग

भद्रावती येथे गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडला, एक आरोपी अटकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *