१८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

Share News

🔸सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, शाखा वरोरा यांच्या वतीने आयोजन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि .16 मार्च) : – सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखा वरोरा यांच्या वतीने सोमवार, दिनांक १८ मार्च २०२४ रोजी वरोरा रेल्वे हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या वतीने अध्यक्ष राकेश कुमार यांनी सांगितले की, ‘रक्तदान, महादान ‘ आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे कुणाचाही जीव जाणार नाही, या उद्देशाने वरोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी ९.०० वाजता होणार असून शिबिर सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी इच्छुकांनी संघाशी संपर्क साधावा.

शिबिराच्या यशस्वितेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखा वरोरा अध्यक्ष राकेश कुमार, कार्याध्यक्ष विनोद कुमार, सचिव बी.के. भुयान, कोषाध्यक्ष आशिष हरणे आदींनी केले आहे.

Share News

More From Author

श्री संत विदेही सदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थान कोकेवाडा व्दारा घुगरी काल्याचे आयोजन

होमगार्ड्सच्या मानधनामध्ये वाढ करावी…पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *