अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलिसांनी केली अटक

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.2 मार्च) :- भद्रावती तालुक्यातील एका गावात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आरोपी पवन नागोसे वय 19 वर्षे, राहणार पिचगावष तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ याला अटक करण्यात आली आहे. आरोपी पवन याचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी नाते असल्यामुळे तो नेहमी या कुटुंबाकडे गेल्या वर्षभरापासून येत जात होता.

यादरम्यान त्याने पीडित मुलीशी शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यात ती चार महिन्याची गर्भवती राहिली. गर्भवती असल्याची माहिती मिळाल्यानंतर या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली. त्यानंतर भद्रावती पोलिसांनी आरोपीवर पास्को अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपी सटक केली. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.