सोईटच्या येथील मुजोर तलाठ्याला तहसीलदारांनी दिली समज 

Share News

🔸तात्काळ पंचनामे करा असे दिले आदेश 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 फेब्रुवारी) :- वरोरा तालुक्यातील सोईट येथील मुजोर तलाठी गारपीट ग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतातील पंचनामे करण्यास टाळाटाळ करीत होतो. नुकसान होऊन देखील नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांची पंचनामे करण्यात आले नाही. कृषी सहायक, ग्राम सेवक हे नुकसान झाले असे सांगत आहे तरी तलाठी पंचनामे करण्यास नकार देत आहेत अशीतक्रारशेतकर्‍यांनी विधानसभा प्रमुख युवासेना अभिजीत कुडे यांच्याकडेकेली. शेतकर्‍यांच्या तक्रारी घेवून शिवालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालय येथे आले तालुका प्रमुख दत्ता बोरेकर व विधानसभा प्रमुख युवासेना अभिजीत कुडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार साहेब याना निवेदन देवून तात्काळ शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी केली.

विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे व युवा जिल्हा अधिकारी रोहण कुटेमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले. जुलै महिन्यात झालेल्या पुरात नदी नाल्याजवळ च्या शेतकर्‍यांची अतोनात नुकसान होऊन देखील पात्र शेतकरी यांचे नाव वगळण्यात आली, तलाठी शेतकर्‍यांची गैरव्यवहार करत असून उडवाउडवीची उत्तरे देत असतो, साजा वर हजर राहत नाही. आर्थिक व्यवहार करून आपल्या मर्जीतील लोकांचे काम करतो. गारपीट होऊन नुकसान होऊन देखील पंचनामे करत नव्हता. शेतकऱ्यांशी दमदाटी करून टाळाटाळ करीत होते त्या नंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तहसीलदार साहेब याना निवेदन देण्यात आले.

तहसीलदार साहेबानी सर्व शेतकर्‍यांच बोलणे समजून घेतले व तात्काळ पंचनामे करा असे आदेश दिले त्यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलले. मुजोर तलाठी यांनी शेतकऱ्यांशी वर्तवणुक चांगली करावी . यावेळी दीपक पुसदेकर,विजय डंभारे, अक्षय देवतळे, प्रतीक घुगरे, वैभव कोहपरे, अनिल फुलकर, अविनाश भोयर, कपिल काळे,नानाजी पुसदेकर,प्रविण पुसदेकर, अविनाश डोमकावळे ,वैभव पुसदेकर उपस्थित होते.

Share News

More From Author

झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

खांबाडा येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *