अवैधरित्या जनावरे वाहतूक बुलेरो पिकप जप्त

Share News

🔸शेगाव पोलिसांची कारवाई

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.14 फेब्रुवारी) :- अवैद्य रित्या जनावरे वाहतूक करणारी पिकप चिमूर मार्गे समुद्रपूर येथे नेत असल्याची गुप्त माहिती मिळाली, शेगाव पोलीस यांनी सापळा रचून पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आमडी चिचघाट येथे नऊ जनावरे सहित पकडण्यात आली..

त्यामध्ये 3 गाई 2 कालवड 4 बैल असुन किंमत 49,500 रूपये व पिकअप mh29 m1455 किंमत 2,00,000 रूपये जप्त करण्यात आले असून चालक हा चिमुर येथील आदील शेख, सुनील वैद्य खडसंगी यांच्यावर कलम 5,5 (अ)5, ( ब) 1976 सह कलम11( 1) ( ) ( घ) ( ड) 1960 सहकलम 47,50 पशु वाहतूक नियम 1978, मोटार वाहन कायदा 83/ 177 गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व जनावरे यांना प्यार फाउंडेशन दाताळा,चंद्रपूर येथे पाठवण्यात आले असून अधिक तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Share News

More From Author

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *