तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Share News

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर(दि.14 फेब्रुवारी) :- बल्लारपूर शहरातील एक तरुण सोमवारी सकाळी दुचाकी घेऊन घराबाहेर पडला.मात्र बराच वेळ झाला. पण तो घरी परतला नाही. त्याची शोधाशोध घरातील मंडळीने केली.मात्र त्याचा थांगपत्ता कोठेच लागला नाही.त्याच दिवशी रात्री चंद्रपूर – बल्लारपूर मार्गांवर गस्ती दरम्यान रस्त्याच्या कडेला एक दुचाकी बेवारस दिसून आली.याची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्याचा त्या तरुणाचे नातेवाईक बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी आले.तेव्हा ही घटना चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर जंगलात उघडकीला आली.जंगलात एका झाडाला तो तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव अमित चौहान ( २७) रा.राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपूर असे आहे.

बल्लारपूर येथील अमित चौहान हा घरीच कपडे शिवण्याचा व्यवसाय करत होता.तो सोमवारी सकाळी घरून दुचाकी क्रमांक एम.एच.१५/ एच.एफ.५४0९ घेऊन घरबाहेर पडला.मात्र रात्र होऊनही तो घरी आला नाही.यामुळे घरातील मंडळी चिंताग्रस्त झाले.

अखेर घरातील नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून अमित बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी गेले.त्याच वेळी पोलिसांचे गस्तीवरील पथक ठाण्यात आले.त्यांनी चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील चुनाभट्टी जवळ बेवारस दुचाकी असल्याची माहिती दिली.सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास अमितच्या मोबाईलवर संपर्क करून ठिकाणाच शोध घेण्यात आला.

चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील जवळपास शंभर मिटरच्या आत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अमितचा मृतदेह आढळून आला.त्यावेळी प्रसाद चौहान यांनी हाच अमित असल्याचे सांगितले.

यावेळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णाल्यात हलविण्यात आला.वृत्त लिहिण्यापर्यंत अमितच्या मृत्युचे कारण कळू शकले नाही. घटनेचा अधिक तपास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात सहायक उपपोलीस निरीक्षक गोविद चाटे व त्यांचे पथक करत आहे.

Share News

More From Author

रॉयल क्रिकेट क्लब विजयी

अवैधरित्या जनावरे वाहतूक बुलेरो पिकप जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *