भरधाव दुचाकी टिप्पर मध्ये घुसली : २ ठार १ गंभीर

Share News

🔸खांबाडा येथील घटना

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.13 फेब्रुवारी) :- तालुक्यातील खांबाडा येथील पेट्रोल पंप वरून डिझल भरून वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथे जात असलेल्या टिप्पर ला भरधावं वेगात असलेली दुचाकी टिप्पर च्या मागून घुसली यात घडलेल्या अपघातात दुचाकीवरील २ जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी असल्याची घटना खांबाडा येथील उदय बार जवळ सायंकाळी ७.३० वाजता घडली. मारोती चप्पलवार {२२), वैभव अडबले (२० ) दोघेही राहणार गोठाडी शेगाव, जि. वर्धा असे मृतक युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथील गिता कन्ट्रक्शन कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच ३४ – २८०६ हा डिझेल भरण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याची सीमा असलेल्या खांबाडा येथील पेट्रोल पंप वर आला. डिझल भरून परत जात असताना त्याच मार्गाने तीन जण बसलेली दुचाकी भरधावं वेगात टिप्परच्या मागच्या बाजूने घुसली या भीषण अपघातात मारोती चप्पलवार व वैभव अडबले या दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.

तिघेही वर्धा जिल्हातील गोठाडी शेगाव, येथील रहिवाशी असुन वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे खांबाडा येथे दारू पार्टी करण्यासाठी आले असल्याची चर्चा आहे. वृत्त लिहीपर्यंत गंभीर जखमी युवकाचे नाव कळले नाही. घटनेची माहिती मिळताच वरोरा येथील रुग्णदूत लखन केशवानी घटना स्थळी तात्काळ दाखल होत अपघातग्रस युवकांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलीस करीत आहे.

Share News

More From Author

अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या

रॉयल क्रिकेट क्लब विजयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *