महात्मा फुले कर्ज माफी योजनेतील अनुदानाचा राज्य सरकारला पडला विसर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत अनुदान मिळणार तरी केव्हा शेतकरी पुत्र विनोद उमरे यांचा प्रश्न

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.4 फेब्रुवारी) :- महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान ३१ मार्च ३०२३ पर्यंत देऊ असे आश्वासन राज्य सरकार यांनी दिले होते.पण ३१ मार्च २०२४ ही तारीख अवघ्या दोन महिन्यांवर येऊन राहीले तरी राज्य सरकार यांनी महात्मा फुले कर्ज माफी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन पर अनुदाना काही दिले नाही नसल्याचे शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी म्हटले आहे.तर ३१ मार्च २०२३ पर्यंत अनुदान देऊ राज्य सरकारचे आश्वासन देऊन राज्य सरकार शेतकरी राजाची दिशाभूल केली.असे शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी म्हंटले आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर ५० हजार रुपये मिळणार आहे.यामुळे प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला.या योजनेंतर्गत है पैसे मिळणार होते.पण पात्र लाभार्थी शेतकरी याना प्रोत्साहन पर अनुदाना पासुन प्रतीक्षेत आहे.सन २०१७ ते २०२० या तीन वर्षां पैकी दोन वर्ष नियमितपणे पीक कर्जची परतफेड केली आहे.अशा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे.

पण ३१ मार्च २०२३पर्यंत ५० प्रोत्साहन पर अनुदान देऊन असे राज्य सरकारने आश्वासन दिले होते तर ते आश्वासन वाऱ्यावर गेले आहे.कर्ज माफी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकरी यांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे महात्मा फुले कर्ज माफी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरात लवकर ५० हजार अनुदान देण्यात यावे. अशी मागणी शेतकरी पुत्र विनोद उमरे यांनी केली आहे .

Share News

More From Author

शेगाव बू येथे हजरत बाबा लंगरशाह वली यांचा उर्स जल्लोषात साजरा

चंदनखेडा येथे समाज प्रबोधन कार्यक्रमात आदिवासी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *