शेगाव बू येथे हजरत बाबा लंगरशाह वली यांचा उर्स जल्लोषात साजरा

Share News

🔸उर्स मध्ये सर्व धार्मियांनी सहभाग घेऊन दिला एकतेचा संदेश

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.2 फेब्रुवारी) :- स्थानिक शेगाव बू मध्ये पैगामे रजा सेवा समिती व समस्त शेगाव वासिय मिळून हजरत बाबा लंगरशाह वली यांचा जयंती निमित्त दि. १ फेब्रुवारी ला भव्य फिरती कव्वालीने मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शेगाव येथील जमा मस्जिद जवळून गावातील मुख्य रस्त्यानी काढण्यात आली होती. या मध्ये घोड्याना सजवन्यात आले होते.

संपूर्ण रस्त्यानी फिरताना कव्वाल यांनी सर्व धार्मियांचे गाणे म्हणत मिरवणुकीत एक वेगळीच रौनक निर्माण केली होती. या मिरवणुकीत मुस्लिम बांधवान सोबत समपूर्ण गावातील नागरिक सहभागी झाले होते. मिरवणूक निघताना हजरत लंगरशाह वली यांचे दर्गाह वर फुलांची चादर चढवण्यात आली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शेगाव चे नवीन ठाणेदार शैलेंद्र ठाकरे व सम्पूर्ण पोलीस प्रशासनाने विशेष सहकार्य दिले. तसेच या साठी विशेष मेहनत पैगामे रजा सेवा समिती यांनी घेतली.

Share News

More From Author

घोडपेठ क्षेत्रातील महिला व युवा यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रवेश

महात्मा फुले कर्ज माफी योजनेतील अनुदानाचा राज्य सरकारला पडला विसर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत अनुदान मिळणार तरी केव्हा शेतकरी पुत्र विनोद उमरे यांचा प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *