51 हजार महामृत्युंजय मंत्र लिहून रेखाटले चित्र

Share News

🔸महान उद्योगपती रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्य स्तुत्य उपक्रम

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि .30 डिसेंबर) :- शहरातील कु.गायत्री गजानन खोके या मुलींनी महान उद्योगपती श्री. रतन टाटा यांच्या 86 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे 51 हजार महामृत्युंजय मंत्र लिहून चित्र रेखाटले आहे. या पेंटिंग ची उंची 7 फूट असून या मंत्रात एकूण 33 शब्द आहे. म्हणजेच 16 लाख 83 हजार शब्द लिहिलेले आहे..

लहानपणा पासून या कलेची आवड असलेल्या गायत्री ने महाराष्ट्रातील विविध संताची तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान असणाऱ्या मान्यवरांची चित्र रेखाटली आहे…. ही रेखाटलेली पेंटिंग श्री. रतन टाटा यांची भेट घेऊन त्यांना देऊ असे तिने माध्यमाशी बोलताना सांगितले. ती या पेंटिंग चे श्रेय आपल्या आई – वडिलांना तसेच गुरुजनांना देते. तालुक्यात सर्वत्र या पेंटिंग ची चर्चा होत आहे.

Share News

More From Author

कान्सा (सि.) येथील मोफत आरोग्य शिबीरात ४९७ रुग्णांनी घेतला लाभ

राजुऱ्यात गोंडपिपरी वरून रेतीची तस्करी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *