ॲड.अमोल बावणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ( अजितदादा पवार गटाच्या ) राज्य संघटक पदी नियुक्ती 

Share News

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.20 डिसेंबर) :- भोई समाजाचे नेते तथा राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष ॲड.अमोल बावणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट ) महाराष्ट्र प्रदेश राज्याच्या राज्य संघटक पदी नियुक्ती झाली आहे.

ॲड.अमोल बावणे यांचे संघटनात्मक कार्य चांगले आहे त्यांची समाजावर संघटनात्मक कार्याची पकड चांगली असून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामधील २०१९ मध्ये वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी कडून विधानसभा निवडणूक लढविली होती. ॲड. अमोल बावणे हे भोई समाजाचे नेते व उच्चशिक्षित युवा तरुण तडफदार नेतुत्व असून त्यांचे संघटनात्मक कार्य खूप मोठे आहे .त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशा नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य संघटक अविनाशजी काकडे यांनी ॲड.अमोल बावणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश च्या राज्य संघटक पदी निवड केली असून त्यांना चंद्रपूर , गडचिरोली , गोदिया , भंडारा व नागपूर या जिल्हातील संघटनात्मक कार्याची जबाबदारी दिली आहे. तसेच पक्षाचे धेय्य धोरण सर्वसामन्य नागरीका पर्यंत पोहचविण्यासाठी , पक्ष बळकटीकरणाची व पक्ष संघटन कार्य वाढविण्याची फार मोठी जबाबदारी दिली आहे. 

ॲड.अमोल बावणे यांच्या राज्य संघटक पदी नियुक्तीने विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन व पक्ष बांधणीचे काम बळकट होणार, त्यामुळे यांची राज्य संघटक पदी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्या मध्ये सर्वत्र उत्साह संचारला असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले व सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. सदर नियुक्ती पत्र नामदार अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ॲड.अमोल बावणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश च्या राज्य संघटक पदी नियुक्ती पत्र देवून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य संघटक अविनाशजी काकडे तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share News

More From Author

मनसे वाहतूक सेनेतर्फे रास्तारोको आंदोलन

युरिया खतात कृषी दुकानदार कडून शेतकऱ्यांची लुट धाबवा कृषी विभागाणे जातीने लक्ष देण्याची गरज… शेतकरी नेते विनोद उमरे यांची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *