मनसे वाहतूक सेनेतर्फे रास्तारोको आंदोलन

Share News

🔸वरोरा चिमूर कानपा महामार्ग बांधणीचे काम रखडल्याने अपघात वाढल्याने मनसे आक्रमक

✒️चिमूर (Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर (दि .19 डिसेंबर) :- मागील अनेक वर्षांपासून वरोरा चिमूर व त्यानंतर कानपा या महामार्गाचे बांधकाम संथगतीने होत॑ असताना आता ते बंद करण्यात आले आहे.

काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती मिस्त्रित मुरुम या महामार्गाच्या बांधकामात वापरल्याने त्यांची डस्ट या रस्त्याने जाणाऱ्या वाहनांमुळे सर्वत्र पसरत असल्याने या परिसरातील शेत पिकांचे नुकसान होत॑ आहे व दोन चाकी गाडी चालकांना या प्रदूषणाचा मोठा त्रास होत॑ आहे .

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे चिमूर तालुका अध्यक्ष प्रमोद श्रीरामे यांच्या नेत्रुत्वात रास्तारोको आंदोलनं करण्यात आले. यावेळी तालुक्यातील असंख्य नागरिक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Share News

More From Author

वरोरा-भद्रावती तालुक्यातील सोयाबीन नुकसान भरपाईची नुकसान भरपाई द्या

ॲड.अमोल बावणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ( अजितदादा पवार गटाच्या ) राज्य संघटक पदी नियुक्ती 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *