केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे खेमजई येथे उद्या आगमन

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.15 डिसेंबर) :- वरोरा तालुक्यातील शेगाव येथून जवळच असलेल्या खेमजई येथे विकसीत भारत संकल्प यात्रा दरम्यान येत असल्याने . शेगाव ते टेमुर्डा हा मार्ग बंद राहणार असल्याचे शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी सांगितले. तेव्हा या मार्गावर देखील पोलीस बंदोबस्त लावण्यात येत असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

उद्या दिनांक 16/12/2023 चे दुपारी 3 वाजता मा केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी (पेट्रोलियम , नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण) खेमजई येथे भारत सरकार तर्फे चालविण्यात येणाऱ्या *विकसित भारत संकल्प यात्रा* साठी येणार आहे. या मध्ये भारत सरकार तर्फे राबविण्यात येणारे विविध योजना ची माहिती देणार आहे. 

तर शेगाव ते टेंबुर्डा मार्ग इतर प्रवासी साठी बंद राहणार आहे. त्यांना पर्यायी मार्ग शेगाव-सालोरी-भटाळा-टेबुर्डा असा चालू राहील. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. पोलिस प्रशासन चंद्रपूर यांचे आव्हाहन..

Share News

More From Author

ग्रामपंचायत च्या हलगर्जीपणामुळे दररोज हजार लिटर पाणी वेस्टेज

वार्षिकोत्सवातून विद्यार्थ्यांना स्टेज डेरिंग मिळते…माजी नगराध्यक्ष अनील धानोरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *