शेगावात चिमूर वरोरा राष्टीय माहामार्ग चे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन

Share News

राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता बोबडे यांचे लेखी आश्वाषणा नंतर आंदोलन मागे

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि .13 डिसेंबर) :- वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथे आज दि. १३ डिसेंबर ला बस्थानक शेगाव बु येथे चिमूर वरोरा महामार्ग ३५३ ई चे मागील ७/८ वर्षां पासून अर्धवट काम त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले.   

या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे कित्तेकांना आपला जिव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले असून मागील २ महिन्या पासून रस्त्याचे काम करणाऱ्या एस. आर. के. कंपनी चे पूर्ण काम बंद केले आहे. त्यामुळे स्थानिक जनतेला, प्रवाशांना, ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे याच्या विरोधात हे आंदोलन शेगाव मधील नागरिक आणि परिसरातील त्रस्त नागरिक यांनी आयोजित केले होते. सुमारे २ तास वाहतूक ठप्प झाली होती आंदोलन पूर्ण होत पर्यंत शेगाव मधील संपूर्ण व्यापारी मंडळींनी स्वयंस्पुर्तीने आपली दुकानें बंद ठेऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. नंतर स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांचे माध्यस्थीने राष्ट्रीय माहामार्ग चे उपविभागीय अभियंता बोबडे यांचे लेखी आश्वाषणा नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

  यात अभियंता बोबडे यांनी येत्या आठ दिवसात कामाला रस्त्याच्या कामावर नवीन कंपनीची नियुक्ती करुन येत्या मे महिन्याच्या शेवट पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल.

शेगाव मध्ये उडणाऱ्या धुळी साठी रोज रस्त्यावर पाणी मारण्यात येईल.

व भेंडाला जवळ रस्त्याच्या मधात गरज नसताना उभी असलेली मशीन लवकरात लवकर रस्त्याच्या बाजूला हटवण्यात येईल अशा स्वरूपाचे लेखी अशासान दिले.

या आंदोलनात शेगाव येथील नागरिक, परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Share News

More From Author

आदिवासी शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करा : रविंद्र शिंदे

भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अहेतेशाम अली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *