वाहनाच्या धडकेने वाघिणीचा मृत्यू

Share News

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.11 डिसेंबर) :- वरोरा तालुक्यातील खांबाडा ते नागरी या मार्गावर असलेल्या वडगाव मुरद गाव येथील नाल्यामध्ये आज दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका तीन वर्षे वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकिस आली.

  खांबाडा- नागरी या मार्गावर असलेल्या मुरदगाव या गावाजवळ असलेल्या नाल्यामध्ये एका तीन वर्षे वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली, दुपारी दीड वाजताच्या सुमानास येथील नागरिकांनी वनविभागाचे वनसंरक्षक अधिकारी सतीश शेंडे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाचे अधिकारी तथा कर्मचारी यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर यांना दिली.

घटनेची माहिती कळतात त्वरित घटनास्थळ गाठून वन कर्मचाऱ्यांनी नाल्यात पडलेल्या वाघिणीला उचलून जेव्हा विच्छेदनासाठी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास वन्यजीव उपचार केंद्र, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले यावेळी सतीश शेंडे आर. एफ. ओ वरोरा, नायगमकर साहेब सहाय्यक वनसंरक्षक, बंडू धोत्रे, मुकेश भांदककर् एनजीओ ,कर्मचारी उपस्थित होते .

Share News

More From Author

आपल्या हक्काच्या धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्च्यात मोठ्या संख्येने सामील व्हा….महेश नाईक

चिमूर वरोरा महामार्ग वर दोन तासांनी धावली वाहने. राळेगाव येथील आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *