धनगर बंजारा व अन्य कोणत्याही समाजाला खऱ्या आदिवासी मध्ये समावेश करण्यात येवू नये… तुलसी अलाम ( सामाजिक कार्यकर्ता वरोरा)

Share News

🔹महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.10 डिसेंबर) :- आदिवासीहा या देशाचा मुळ निवासी आहे. वनवासी नाही आदिवासीना भारतीय घटनेने अनुसूचीत जमाती म्हणून आरक्षणाचे अधिकार दिलेत मात्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून खऱ्या आदिवासीवर अण्यायच होत गेला खऱ्या आदिवासीना खऱ्या अर्थाने आरक्षणाचे हक्क मिळालेच नाहीत बोगस आदिवासीमुळे खऱ्या आदिवासीचे आतोनातं नुकसान झाले.

शिक्षणातील आणि नोकरीतील लक्षवधी जागा जातीच्या खोट्या प्रमाणपत्राचे आधारे बोगस आदिवासीनी बळकावून घेतल्या कोर्ट -कचेऱ्या झाल्यात परिणामी अनु जमाती प्रमाणपत्र पडताळणी कमिट्याची स्थापना करण्यात आली त्यामुळे आता खऱ्या आदिवासीना न्याय मिळणार असे वारे समाजात वाहू लागले परंतु दि.15/06/1995 चा जी आर. आणि आता दि.22/10/2015 शा. प. मुळे खऱ्या आदिवासीच्या आशा अपेक्षा पार धुळीस मिळाल्या धनगर बंजारा व अन्य कोणत्याही समाजाला खऱ्या आदिवासी मध्ये समावेश करण्यात येवू नये.

दि.20/11/2023 या धनगर समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश करण्याकरीता स्थापन करण्यात आलेली अभ्यास गट समिती बरखास्त्त करण्यात यावी या मागण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाना निवेदन पाठवून आम्हा आदिवासीना न्याय मिळेवा हिच अपेक्षा.

Share News

More From Author

10 डिसेंबर आजचे दिनविशेष

टेंभुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र फोडण्याचा पाचव्यांदा प्रयत्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *