चार चाकी उलटून ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

Share News

🔸चारगाव खुर्द चौकातील घटना

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.7 डिसेंबर) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव खुर्द येथे काल रात्र दहा वाजताच्या सुमारास चार चाकी टाटा सुमो उलटून ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. सविस्तर अशी की गिरोला येथील चाकी टाटा सुमो दररोज परिसरातील महिला मजूर यांना शेत कामाकरिता ये जा करीत होता.

रोजच्याप्रमाणे कालही तो मजूरला घरी सोडून आपली चार चाकी घेऊन घरी जात असताना चारगाव खुर्द येथील पुलाजवळ गाडी पलटी होऊन यात ड्रायव्हर महेंद्र हरिदास कुडमेथे 25 वर्ष राहणार गिरोला यांच्या डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला.

याची माहिती शेगाव येथील पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांना मिळतात त्यांचे सहकारी श्री महादेव सरोदे psi यांनी घटनास्थळ घाटून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करिता वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. विशेष म्हणजे या मार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत असून रस्त्याच्या अर्धवट कामामुळे हा अपघात होत असते त्यामुळे एस आर के कन्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिक मोठ्या संख्येने करू लागली आहे.

Share News

More From Author

श्री गुरुदेव सेवा मंडळ डोंगरगाव (रेल्वे) येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यस्मरण सोहळा

तीन महिन्याच्या बाळासाठी धावली शिवसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *