शेत पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपायोजना करा प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.22 डिसेंबर) :- चिमूर तालुक्यातील सभोवती ताडोबा अंधारी व्याघ्र लागून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान करतात.शेतपिकाचे संरक्षण करण्यासाठी उपायोजना करा.वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना तारेचे/सिमेंटचे मजबूत कंपाऊंड करण्यासाठी उपायोजना करण्यात यावे.

तसेच वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान भरपाईची रक्कम दोन महिन्यांचा आत देण्यात यावे.व चिमूर तालुक्यात ग्रामीण भागात वानरे यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.त्यासाठी वानरे पकडण्यासाठी स्पेशल पथक नेमण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी वनपरिक्षेत्र (प्रादेशिक)वन अधिकारी यांचे कडे निवेदन केले आहे.त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक विलास उमरे, निखिल धानोरकर उपस्थित होते.