कबड्डीच्या सामन्याचा बक्षीस वितरण

Share News

🔸48 किलो आतील एक गाव एक संघ

✒️ गजानन लांडगे महागाव(Yavtmal प्रतिनिधी)

महागाव(दि.17 नोव्हेंबर) :- तालुक्यातील सेवानगर येथे वसंत क्रीडा मंडळ सेवानगर यांच्या वतीने सेवानगर (कासारबेहळ) येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिपावाळीचे औचित्य साधून आयोजित कबड्डीच्या 48 किलो आतील सामन्याचे दिनांक 15 नोव्हेंबर सामन्याचे फायनल पार पडले. त्यामध्ये प्रथम बक्षीस वसंत सेवानगर संघ दृतीय बक्षीस सातघरी संघ तृतीय बक्षीस चिल्ली संघ चतुर्थ बक्षीस खरूस या संघानी पटकाविला . सर्व सामने संपताच सर्व बक्षीस दाते यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

याप्रसंगी प्रेक्षणीय सामन्यांचे धावते समालोचन राजू राठोड, ]भारत राठोड, पत्रकार आजेस जाधव गोर सेना ता. अध्यक्ष महागांव] यांनी केले.तर पंच म्हणून देवा राठोड सर, लहू पवार,दिलीप राठोड सर, ज्ञानेश्वर पवार, संजय नाईक राठोड, यांनी भूमिका बजावली* स्कोर बोर्ड व टाईम कीपर म्हणून सदानंद जाधव, आजेश जाधव, दशरथ राठोड, यांनी काम पाहिले , याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून बक्षीस दाते बी एन चव्हाण, राजू राठोड, राजू धोतरकर, भाविक भगत, अमोल चिकने उपस्थित होते. व समस्त गावकरी उपस्थित होते. मुक्कामी राहणाऱ्या खेळाडूंची जेवणाची उत्तम व्यवस्था सदानंद जाधव (पत्रकार) व अविनाश चव्हाण (ठेकेदार) यांच्याकडे होता.

Share News

More From Author

प्रियंका पांडुरंग गायकवाड शेगांव (खु) हीची युवा संसदेच्या क्रिडा मंत्री पदी निवड

“रमेश नंदकुमार पंडित” यांची भाजपा किसान मोर्चा – महाराष्ट्र “प्रदेश कार्यकारिणी सदस्य” पदी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *