महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ नोव्हेंबर रोजी खानवडीत होणार

Share News

🔸संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची माहिती

✒️सासवड विशेष प्रतिनिधी (saswad विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

सासवड(दि.11 नोव्हेंबर) :- दि. १० खानवडी (ता.पुरंदर) येथे सोळाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे दि २७ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे, . अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, ग्रंथ दिंडी, पुस्तक प्रकाशन,पुरस्कार वितरण, परिसंवाद, कथाकथन,. कविसंमेलन, नाट्यप्रयोग असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 

  प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, बाबाराजे जाधवराव , विजयराव कोलते, सुदामअप्पा इंगळे, दत्ताशेठ झुरुंगे. डाँ दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत. 

साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला परिषदेचे राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता भोंगळे, संजय सोनवणे, दिपक पवार, अरविंद जगताप, दत्ता कड, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, विजय तुपे, अमोल भोसले, डॉ भालचंद्र सुपेकर आदी उपस्थित होते. 

साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक, कथाकार, कलावंत यांनी 9881098481 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राजाभाऊ जगताप यांनी केले आहे.

Share News

More From Author

पत्रकारांनी निस्पृह व निर्भीडपणे लिखाण केले पाहिजे….रवींद्र तिराणिक

ट्रॅफिक पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *