अर्जुनी सालोरी ग्रामपंचायत ची पोट निवडणूक शांततेत

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.5 नोव्हेंबर) :- पोलीस स्टेशन शेगाव बू अंतर्गत ग्रामपंचायत निवडणूक सालोरी ला 85.53% आणि अर्जुनी ला 73.50% मतदान शांततेत पार पडले.

पोलिस स्टेशन शेगाव बू चे ठाणेदार यांनी सालोरीं आणि अर्जुनी गावातील सर्व उमेदवारांची मीटिंग घेऊन निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी या साठी सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे सालोरी आणि अर्जुनी गावातील उमेदवार यांनी पोलिस प्रशासनाला सहयोग करीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्या साठी पुरेपूर सहयोग केले. त्यामुळे सालोरी आणि अर्जुनी गावातील मतदान प्रक्रिया पूर्णतः शांततेत पार पडले. गावकऱ्यांनी पण या वेळी ग्रामपंचायत निवडणूक येवढ्या शांततेत पार पडले यासाठी शासनाचे आभार आणले.

सर्व उमेदवार यांनी एकतेचा संदेश देत मतदान झाल्यावर सोबत फोटो काढून आनंद व्यक्त केला.