✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.29 ऑक्टोबर) :- तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या शेतातील विद्युत ट्रान्सफरमर बंद असून महिना होऊन देखील शेतकर्यांना अजून पर्यंत ट्रान्सफरमर मिळाला नाही. ट्रान्सफरमर उपलब्ध नाही असे कारण देत टाळाटाळ केली जात आहे. शेतकऱ्यांनी जगणे मुश्किल आहे, जगावं की मारावे असा प्रश्न पडतो आहे.
शेतकरी म्हणून जन्म झाला ही चुकी आहे का? एकतर सोयाबीन पीक पूर्ण शेतकर्यांच्या हातातून निसटून गेले त्या मुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पावसाने दडी मारल्याने त्यांना कापूस पण होणार की नाही याची खात्री नाही त्यातच ओलीत आहे त्या शेतकर्यांना जीव धोक्यात घालून रात्री पाणी द्या साठी जाव लागते. कृषिप्रधान देशात शेतकर्याला किम्मत आहे का असा प्रश्न अभिजित कुडे यांनी केला. शेतकरी रात्री वीज देत आहे तरी जीव मुठीत धरून ओलीत करत आहे.
या निर्दयी सरकार व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकर्यांच्या जिवाची पर्वा नाही. पण शेतातील विद्युत ट्रान्सफरमर गेले तर महिना होऊन देखील शेतकर्यांना मिळत नाही ही शोकांतिका आहे. जिथे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्यात त्याची च दिवाळी अंधारात होणार आहे. अनेक वेळा तक्रार देवून देखील ट्रान्सफरमर मिळत नाही म्हणून शेतकर्यांनी आत्महत्या करावी का, आधीच शेतमालाला भाव नाही. खत बियाणे यांच्या किमती वाढल्या पण शेतमालाला हमीभाव सुद्धा मिळत नाही आधीच शेतकरी कर्जबाजारी झाले आहे आयुष्य कर्ज फेडण्यात जात आहे.
शेतात विहिरीत पाणी आहे पण वीज नाही. पोटच्या पोरासारख पिकाची काळजी घेतली ते पीक डोळ्या समोर वारत आहे. कित्येक ट्रान्सफरमर बंद आहे ते अजून लावले गेले नाही आम्ही महावितरण कंपनीने अधिकार्यांना कॉल केला तर ट्रान्सफरमर नाही असे उत्तर देतात पीक हातातून निसटून गेल्यावर ट्रान्सफरमर देणार का 4,5 दिवस ठीक आहे पण महिना होऊन पण शेतकर्याला ट्रान्सफरमर मिळत नाही.
शेतकऱ्यांनी जगावं की मरांव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफरमर बंद आहे तक्रारी येवून देखील लावले गेले नाही ते तात्काळ उपलब्ध करून लावून द्यावे अन्यथा वरोरा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला. शेतकरी पुत्र आहे याची लाज वाटते असी खंत यावेळी अभिजित कुडे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांची हताश होऊ नाही या जुलमी महावितरणच्या अधिकाऱ्यांना व शासनाला धारेवर धरू.