पक्ष प्रवेश ही आमच्या कामांची पावती : रविंद्र शिंदे

Share News

▫️शिवसेना (ऊबाठा) पक्षात मोठ्या संख्येने युवक, महिला व ज्येष्ठांचा प्रवेश

🔸शिवसेनेच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून पक्षात इनकमिंग  सुरूच

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.6 ऑक्टोबर) :- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे “होऊ द्या चर्चा” अभियानांतर्गत भांडाफोड कार्यक्रम स्थानिक श्री. मंगल कार्यालय येथे नुकताच भरगच्च स्वरूपात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून अनेकांनी पक्षात प्रवेश घेतला.

हिंदुहृदसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे अंगीकृत ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अपेक्षित असलेले कार्य व पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य उध्दवराव ठाकरे यांचे कार्याला प्रेरीत होवून तसेच वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या यांचे सतत समाजाच्या प्रत्येक घटकाची समाजसेवा व न्याय देण्याचे कार्य सुरू असल्याने मागील अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले पक्ष प्रवेश हे आमच्या कामांची पावती आहे, असे रविंद्र शिंदे म्हणाले.

यावेळी स्थानिक श्री. मंगल कार्यालय येथे पक्षाचे उपनेते, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र निरीक्षक, कामगार नेते माजी नगरसेवक मनोज जी. जामसुतकर, मुंबईचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील मुंबई युवा सेनेचे समन्वयक अमित जाधव, उदय वागडेजी, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, सौ. नर्मदा बोरेकर (चंदपूर जिल्हा प्रमुख महिला आघाडी), युवा सेना सचिव, पूर्व विदर्भ तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, भास्कर ताजने (उप-जिल्हा प्रमुख), कु.प्रतिभा मांडवकर युवतीसेना (जिल्हा युवती अधिकारी), वैभव डहाणे (विधानसभा समन्वयक), मंगेश भोयर (विधानसभा संघटक), नरेद्र पढाल (भद्रावती तालुका प्रमुख).

दत्ता बोरेकर (वरोरा तालुका प्रमुख), सौ मायाताई नारळे (उपजिल्हाप्रमुख महीला आघाडी), घनश्याम आस्वले (भद्रावती शहरप्रमुख), राहुल मालेकर (युवासेना प्रमुख), सौ अश्लेषा जिवतोडे भोयर (भद्रावती तालुकाप्रमुख महीला आघाडी तथा युवतीसेना जिल्हा समन्व्यक), सौ. माया टेकाम (भद्रावती शहर प्रमुख महीला आघाडी), शिला आगलावे (उपतालुका संघटिका), शिव गुडमल (युवतीसेना उपजिल्हाधिकारी), नेहा बनसोड (भद्रावती तालुका युवती अधिकारी), सौ भावनाताई खोब्रागडे (समन्वयक भद्रावती शहर) व वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील समस्त पदाधिकारी  व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

पक्ष प्रवेश घेणाऱ्यामधे स्थानिक शहरातील अनुज आगलावे, ओंकार ढेंगळे, अनिकेत तिवाडे, हरिष तडसे, लोकेश तुपट, सक्षम डाखरे, प्रथम जिवतोडे, शिव पाकमोडे, मनिष बोथले, प्रज्वल जिवतोडे, प्रविण पालकर, सुमित्रा गजलेकर, शामला चिकटे, शुभांगी येन्नावार, तालुक्यातील सागरा या गावातील ग्रा. पं. सदस्या सौ. अर्चना संजय वाग्दरकर.

सदस्या सौ.सोनुताई प्रशांत टोगे, ग्रामसंघ अध्यक्ष सौ. गोदाबाई गुलाब बांदुरकर, देवराव पडवेकर, नंदोरी या गावातील ग्राम शाळा समिती अध्यक्ष रविंद्र एकरे, नवयुवक हनुमान गणेश मंडळ सचिव तन्मय बलकी, उपाध्यक्ष गणेश बलकी, अनिल कुळसंगे, शुभम ठावरी, रितेश पाचभाई, नागलोन या गावातील बेबी नवले, वनिता ढवस, सुनिता पारखी, कविता यादव ढवस, लता सुनिल ढवस, कविता अकुंश मंगाम, मिनाक्षी सचिन महातळे, विभा नंदकिशोर ढवस, सुनिता अंकुश आत्राम, चंदा नंदकिशोर बोंडे, बबिता दिपक जगनाडे, चोरा या गावातील सरपंच सौ.संगिता खिरटकर, चरुरखटी येथील ग्राम पंचायत सदस्य प्रविण मेश्राम, व इतर शेकडोंनी पक्षात प्रवेश घेतला.

Share News

More From Author

शेगांव (खुर्द) येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिर व अभ्यासिकेचे थाटात उद्घाटन

खिदमत सोशल फाऊंडेशन च्या वतीने शनिवारी वरोरा येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *