आठ वर्षा पासून राखडलेले काम त्वरित पूर्ण करुन लवकरात लवकर लोकार्पण करावे :- प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.25 ऑक्टोबर) :- वरोरा तालुक्यातील शेगाव ( बु ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला २०१४ माधे मंजुरी मिडाली होती. २०१६ ला कामाला सुरुवात होऊन २०१८ ला ते पूर्ण झाले. परंतु संरक्षण भीन्त व आरोग्य केंद्राकडे जाणारा रोड पूर्ण ण झाल्या मुळे मागील पाच वर्षा पासून या इमारतीचे उदघाट्न रखडलेले आहे.

शासनाचे २ कोटी रुपये खर्च करुन उभी असलेली ही इमारत व निवास्थानी धूळ खात असून त्याचा जनतेला कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही. शेगाव ला आजूबाजूचे ५०/६० खेडे जोडलेली असून, आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना तसेच गर्भवती महिलांना आपत्कालीन परिस्थितीत नाईलाजाने वरोरा ला जावे लागते.

जे त्यांना परवडणारे नसून वेळ सुद्धा वाया जातो. तेव्हा हे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करुन व त्यावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन २५ खाट चे हे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करुन जनतेच्या सेवेत उपलब्ध करुण द्यावे अशी मागणी प्रहाचे अक्षय बोन्दगुलवार यांनी केली आहे.