स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट कडून नवरात्री उत्सवात  भगिनिला जगण्यासाठी मिळाला मदतीचा हात 

🔹शिलाई मशीन भेट : इंगोले कुटुंबियांकडून  ट्रस्टप्रति  कृतज्ञता व्यक्त

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.20 ऑक्टोबर) :- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने वरोरा येथील गुरुदेव नगर शिवाजी वार्ड येथील होतकरू व गरजू  संगीता अरूण इंगोले  यांना नवरात्री उत्सवात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने जगण्यासाठी मदतीचा हात देत ,शिलाई मशीन भेट दिली. यामुळे इंगोले कुटुंबियांकडून  ट्रस्टप्रति  कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.

   काल दि. १९ ऑक्टोंबर रोजी  वरोरा येथील  कला वैभव सामाजिक तथा सांस्कृतिक मंडळाच्या  वतीने आयोजित दुर्गा उत्सवात शिवसेना  (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवास शिंदे यांच्या शुभहस्ते  संगीता अरूण इंगोले यांना शिलाई मशीन भेट देण्यात आली.

या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक  उल्हास करपे , वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावतीचे माजी नगर सेवक प्रशांत कारेकर, कला वैभव सामाजिक तथा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डाँ.राजेंद्र ढवस,सचिव प्रा.नरेंद्र लांबट,संयोजक ॲड जयंत ठाकरे,चंद्रकांत दांडेकर,निखिल सरोदे,प्रमोद काळे,दत्तु आस्वले व ट्रस्टच्या कार्यवाहक वर्षा खेमराज कुरेकार यांच्यासह असंख्य बंधू -भगिनी उपस्थित होते.

     संगीता अरूण इंगोले यांनी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांनी शिलाई मशीन भेट दिल्या बद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. या भेटीमुळे आपल्या कुटूंबाला आर्थिक बळ मिळेल. त्यामुळे आपण रविंद्र शिंदे यांचे सदैव ऋणी राहू . असेही संगीता इंगोले या प्रसंगी म्हणाल्या.