शेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

94

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.16 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव बू येथे काल एका वृद्ध शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर असे की या वर्षी अती वृष्ठी मुळे अनेक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शिवाय हाती आलेले पीकाला अनेक रोगाने पिके नष्ट केले.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यावर शासकीय निमशासकीय संस्था तसेच बँकेचं कर्ज आहेत शिवाय नापिकने सदर बँकेचे कर्ज कसे फेडायचे या मुख्य चिंतेत अनेक शेतकरी आहेत . परंतु काल शेगाव बू येथील श्री नागोराव किसन फुटाणे वय ७५ वर्ष राह.शेगाव यांनी आपल्या शेतात जाऊन स्वतःच्या शेतात विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यांच्यावर देखील बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज होते असे नागरिकांनी सांगितले.

सततच्या नापिकिने कंटाळून श्री नागोराव किसन फुटाणे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली . सदर त्यांच्या पच्यात त्यांचे कुटुंब असून सर्सवी कुटुंब शेतीच्या भरोषावर आपला उदरनिर्वाह करीत होते. तेव्हा त्यांच्यावर असलेले कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे अशी मागणी श्री गजानन ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख शेगाव तसेच गावकऱ्यांनी केली आहे .