अँटी रेबीज लसीकरण व दुध व्यवसायात हिरव्या चाऱ्याचे महत्व याविषयी कार्यशाळा

43

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.11 ऑक्टोबर) :- पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक शेगाव बु पं. स. वरोरा जि प चंद्रपूर व परिवर्तन आदिवासी उपजीविका विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन निमित्त साधून अँटी रॅबिज लसीकरण शिबिर जनजागृती व दुग्ध व्यवसायात हिरव्या चाऱ्याचे महत्त्व या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री यशवंत भाऊ लोंडे ग्रा स शेगाव बु तसेच उद्घाटक श्री मेश्राम साहेब ठाणेदार शेगाव पोलीस स्टेशन व प्रमुख मार्गदर्शक श्री बादाडे साहेब प्रोजेक्ट समन्वय व प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून श्री चंद्रदास मोरे सर उपसरपंच ग्रा. प खेमजई श्री सचिनभाऊ नरड, श्री ईश्वरभाऊ नरड , श्री गजाननभाऊ ठाकरे , श्री अक्षयभाऊ बोंदगिलवार , श्री अमोल दातारकर यांनी स्थान भूषविले व मार्गदर्शक केले. 

पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी मा.डॉ. सतीश अघडते (प. वि.अ.) यांनी पशुवैद्यकीय दवाखाना मोकळ्या जागेत बहुवार्षिक हिरव्या चाऱ्याची चाराबाग तयार केली असून पंधरा प्रकारच्या विविध हिरव्या वैरणीचे दूध व्यवसायात महत्त्व पटवून सांगितले तसेच अँटी रेबीज लसीकरण का आवश्यक आहे व रेबीज रोगाविषयी जनजागृती पर महत्व आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले.

तसेच श्री बादाडे साहेब परिवर्तन प्रोजेक्ट समन्वयक यांनी आदिवासी उपजीविका प्रकल्पाची माहिती दिली व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी तसेच पशुपालकांनी स्वतःचा व्यवसाय कसा करायचा व स्वतः कसे उद्योजक व्हायचे याबद्दल मार्गदर्शन केले श्री मेश्राम साहेब यांनी पशुपालकांनी आपल्या हातातील दुग्ध व्यवसाय कसा कमीत कमी खर्चात करायचा याबद्दल मार्गदर्शन केले.

श्री मोरे सर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अठरावा अध्याय गोवंश सुधार यांची आठवण करून दिली श्री सचिन नरड यांनी पशु दवाखान्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच या कार्यक्रमांतर्गत येथे कार्यरत असलेले मा. डॉ. आर वाय शेख ( स. प. वि. अ.) यांच्या सेवानिवृत्ती बद्दल निरोप व डॉ. अनिकेत रविंद्र हिवरे यांची पुढील पशुवैद्यकीय शस्त्रक्रिया पदवी शिक्षण करिता निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पिंपळ शेंडे यांनी केले आभार श्री वैभव चौधरी यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री गोपाल राठोड श्री नानाजी आत्राम श्री योगेश पाटील श्री रमेश भाऊ चौधरी श्री तायडे भाऊ कु आदित्य हिवरे यांनी सहकार्य व परिश्रम घेतले.