युवकाची इरई नदीत उडी घेऊन आत्महत्या Youth committed suicide by jumping into Irai river

Share News

▫️मृतदेहाचा शोध सुरू(The search for the body continues)

 ✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.16 सप्टेंबर) :- तालुक्यातील काटवल येथील एका युवकाने चंदनखेडा परिसरातील इरई नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 16 रोज शनिवारला सकाळच्या सुमारास चंदनखेडा परिसरातील इरई नदीत घडली. अक्षय खापणे वय 25 वर्षे, राहणार काटवल असे या आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून पोलीस मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

या परिसरातून जाणाऱ्या काही लोकांना सदर युवक नदी काठावरून नदीच्या पाण्यात उडी घेताना दिसला. या घटनेची माहिती तात्काळ भद्रावती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर भद्रावती पोलीस घटनास्थळी पोहोचले.चंद्रपूर येथील रेस्क्यू पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असुन ते बोटीच्या सहाय्याने नदीच्या पाण्यात सदर युवकाचा ते शोध घेत आहे.

Share News

More From Author

परसोडा येथे पहिल्यांदाच तानापोळा साजरा Tanapola is celebrated for the first time at Persoda

वरोरा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा लागु करावा Soybean farmers in Warora taluka should be given crop insurance immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *