“चोर पोलीस हा खेळ थांबला” तो रक्षाबंधनाच्या धाग्यामध्ये बांधला…तहशिलदार श्रीकांत पाटील “Chor police stop this game” tied it in the thread of Raksha Bandhan…Tehsildar Shrikant Patil

Share News

▫️“पोलीस हा पारधी समाजाचा शत्रू नसून मित्र आहे हे नामदेव भोसलेच्या कर्तृत्ववान सिद्ध केल”…जेष्ठ विचारवंत बाळकृष्ण रेनके(“The achievements of Namdev Bhosle will prove that the police is not an enemy but a friend of the Pardhi community”…Senior thinker Balkrishna Renke)

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.3 सप्टेंबर) :- जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात इंदापूर पोलीस स्टेशन व शेवराई शेवाभावी संस्था, उरुळी कांचन पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदिवासी पारधी व भटक्या जमाती जनजागृती ३१ ऑगस्ट २०२३ रोजी हा मुक्ती दिवस साजरा करण्यात आला.

हा अनोखा सामाजिक उपक्रम प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल असे मत इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.राखी पौर्णिमेचे अवचित साधून आदिवासी महिलेकडून पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी ज्यांच्यामुळे सर्व सण व उत्सव महापुरुषांची जयंती आम्ही आनंदाने साजरा करतो. सदैव आमचे रक्षण करणारे पोलिस मित्रांना आदिवासी पारधी महिलेकडून राखी बांधून एक वेगळ्या बंधनात माणुसकीचे वेगळे दर्शन आपल्या महाराष्ट्रात कितीतरी वर्षानंतर होत आहे.

आजचा झालेला कार्यक्रम फक्त महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात साहित्यिक नामदेव भोसले व पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यामुळे शक्य झाला आहे.आपण सर्व पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना समाजामध्ये पोलिसांच्या विषयी चांगल्या विचाराची मेसेज ” पोलीस हा पारधी समाजाचा शत्रू नसून मित्र आहे ” असा संदेश या कार्यक्रमाद्वारे आदिवासी पुरस्कार पुरस्कृत व साहित्यिक नामदेव भोसले यांनी व अन्य आदिवासी पारधी समाजातील महिलांनी हा कार्यक्रम साजरा केला आहे असे जेष्ठ विचारवंत बाळकृष्ण रेनके बोलत होते.

इंदापुर पोलीस स्टेशन व शेवराई शेवाभावी संस्था यांच्या वतीने आदिवासी पारधी भगिनींच्या उपस्थितीत एक राखी पोलीसांसाठी, माय भगिनींच्या रक्षणासाठी हा अनोखा अगळावेगळा रक्षाबंधन कार्यक्रम इंदापुर पोलीस स्टेशन मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी सेवा निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार व नवीन पोलीस अधिकारी याचे स्वागत करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमासाठी मा.अध्यक्ष भटक्या विमुक्त आयोग भारत सरकार श्री. बाळकृष्ण रेणके, इंदापूरचे तहसीलदार मा श्रीकांत पाटील, साहित्यिक व आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदापुर पोलीस स्टेशनचे दिलीप पवार, राणी संतोष भोसले, प्रियंका भोसले, रेखा भोसले, निकीता दिपक काळे, मिना पवार, नाझुका पवार, संजय भोसले, दिलीप भोसले, सतिश पवार तसेच इंदापूर पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचारी, आदिवासी पारधी महीला, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Share News

More From Author

14 वर्षीय मुलीचा विनयभंग  करणाऱ्या आरोपीला अटक 14-year-old girl molested The accused arrested

शेतकरी मित्र रमेश पंडित यांची राज्यस्तरीय “कृषीरत्न” पुरस्कारासाठी निवड Selection of farmer friend Ramesh Pandit for state level “Krishiratna” award

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *