14 वर्षीय मुलीचा विनयभंग  करणाऱ्या आरोपीला अटक 14-year-old girl molested The accused arrested

Share News

✒️मनोज कासारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि .3 सप्टेंबर) :- तालुक्यातील एका गावात एक 14 वर्षी अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधून तिचा विनयभंग एका सदतीस वर्षे इसमाने केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराच्या तक्रारीनंतर आरोपी महेश तुराणकर, वय 37 वर्ष राहणार ओंकार लेआउट, भद्रावती याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.

सदर आरोपीची त्या गावात पाळीव जनावर असल्यामुळे तो नेहमी त्या गावात जात येत होता. त्यामुळे तो गावातील सर्वांच्या परिचित होता. घटनेच्या दिवशी सदर आरोपी त्या गावात गेला. सदर मुलगी हि घरात एकटी होती, ही संधी साधून त्याने तिचा विनयभंग केला.

घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आल्यानंतर भद्रावती पोलिसांनी सदर आरोपीवर संबंधित गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल किटे करीत आहे.

Share News

More From Author

आयुध निर्माणी कर्मचार्‍याची गळफास घेउन आत्महत्या An ordnance factory employee committed suicide by hanging himself

“चोर पोलीस हा खेळ थांबला” तो रक्षाबंधनाच्या धाग्यामध्ये बांधला…तहशिलदार श्रीकांत पाटील “Chor police stop this game” tied it in the thread of Raksha Bandhan…Tehsildar Shrikant Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *