जि.प.शाळेतून संगणक चोरणाऱ्या माजी मुख्याध्यापक गेडामवर कारवाई करा Take action against ex-principal Gedam who stole computer from G.P. school

Share News

▫️महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी(Demand of Maharashtra Navnirman Vidyarthi Sena to Education Officer)

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.1 सप्टेंबर) :- तालुक्यातील बोर्डा या गावांतील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतून संगणक चोरी व शा.पो.आ योजनेचे कॅश बुक गहाळ केल्याने माजी मुख्याध्यापक गौतम गेडाम यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांच्या नेत्रुत्वात गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान गटशिक्षणाधिकारी यांनी तीन नोटीस देऊनही सेवानिवृत्त गेडाम यांनी संगणक जमा केले नसल्याने त्याच्या पेंशन मधून पैसे कपात करण्याचा निर्णय घेण्यातयावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा येथील माजी मुख्याध्यापक गेडाम यांनी दिनांक 16/06/2022 ला शाळेचा प्रभार देण्यासंदर्भात मारोतराव रायपुरे केंद्र प्रमुख, वरोरा यांनी शाळेला भेट दिली असता रजिस्टर नंबर 33, पान क्र. 75 वरील नोंदीनुसार दिनांक 26/01/2020 ला गट ग्रामपंचायत, बोर्ड ने शाळेला कंपनीचे संगणक दिलेले आहे. त्या संगणकाची नोंद माल पुस्तकात घेतली आहे, परंतु मून मॅडम यांच्याकडे प्रभार देताना यादीत संगणकाची नोंद माजी मुख्याध्यापक गौतम गेडाम यांनी घेतली नाही व संगणक सुपूर्दही केलेले नाही. तसेच शालेय पोषण आहार योजनेचे कॅश बुक रजिस्टर शाळेत उपलब्ध नाही.

दरम्यान या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे चौकशी अहवाल गटशिक्षणाधिकारी यानी पाठविला आहे परंतु या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसल्याने शाळेच्या संगणकाची चोरी करणाऱ्या माजी मुख्याध्यापकांना जिल्हा परिषद पाठीशी घालत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चक्क मुख्याध्यापकांनी शाळेचे संगणक शाळेतून चोरून न्यावे ही बाब अत्यंत गंभीर असून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे.

करिता माजी मुख्याध्यापक गौतम गेडाम यांनी संगणक व शा.पो.आ योजनेचे कॅश बुक गहाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर त्वरीत फौजदारी कारवाई करावी व त्यांच्या पेंशन मधून संगणकाची किमंत वसूल करावी व त्यातून शाळेला संगणक देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे.

मनसे जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे. मनसे वरोरा तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी. मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रवीण शेवते, देवा येरणे, प्रतीक मुडे, सूरज मानकर, संतोष नागपूरे, मनविसे तालुका उपाध्यक्ष मयूर खंगार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बबलू परचाके इत्यादींची उपस्थिती होती.

Share News

More From Author

लभान सराड फार्मर्स प्रोडुसर कंपनीची दुसरी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न 2nd Annual All General Meeting of Labhan Sarad Farmers Producer Company concluded

बापरे बाप . ट्रक – बस ची धडक..  नागपूर – नागभीड मार्गावरची घटना Dad Truck-bus collision.. Incident on Nagpur – Nagbhid route

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *