लभान सराड फार्मर्स प्रोडुसर कंपनीची दुसरी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न 2nd Annual All General Meeting of Labhan Sarad Farmers Producer Company concluded

Share News

✒️मनोहर खिरटकर खांबाडा(Khambada प्रतिनिधि)

खांबाडा (दि.1 सप्टेंबर) :- वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे लभान सराड फार्मर्स कंपनीची 2री वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 31/8/2023 ला खांबाडा येथे संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन सर्व सभासद यांच्या समोर कंपनीचा मागील वर्षाचा आढावा (जमाखर्च पत्रक, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक व ताळेबंद ई) व चालू वर्षाचे आर्थिक नियोजन, वाढीव कर्जास मंजुरी, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत दालमिल व गोडवून ला मंजूरी ई. विषय सादर करण्यात आले व त्यास मंजूरी घेण्यात आली.

सोबतच सर्व सभासद व गैर सभासद यांचे करीता भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून श्री. गजानन जाधव, संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट हे ठरले.व्हाईट गोल्ड ट्रस्ट हे यू टुब चॅनल चे माध्यमातून कपाशी व सोयाबीन पिकांबाबत मार्गदर्शन करत असतात त्यांचे 3लाख अधिक फॉलोवर्स आहेत. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात कपाशी, तुर व सोयाबीन पिकाबाबत शेतकरी सभासद यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकरयांना येणाऱ्या शंकांचे निरसन केले.

त्याच बरोबर कार्यक्रमा ला लाभलेले कार्यक्रमाचे उ्घाटक मा.श्री. शंकर तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी सोयाबिन पिका विषयी आपल्या अष्ट सुत्रीतून शेतकरयांना मार्गदर्शन केले. तसेच उत्पादन वाढी साठी विविध उाययोजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मा. श्री. त्रूनाल फुलझेले डी.डी. एम नाबार्ड यांनी कंपनी च्या यशस्वीते साठी कंपणी नी विविध उपक्रम राबवून टर्नओव्हर वाढवणे संबंधी मार्गदर्शन केले.

याच बरोबर कार्यक्रमास उपस्थित मा.श्रीमती. प्रिती हिरलकर संचालक आत्मा, चंद्रपूर. मा. श्री. एस. बी लव्हटे, उपविभागीय तथा तालुका कृषी अधिकारी,वरोरा, मा. श्री. जी. पी हटवार, कृषी अधिकारी पं. स. वरोरा, मा. श्री. चेतन उमाटे, क्षेत्र अधिकारी ई फ को, चंद्रपुर, मा.श्री.एस. विश्वकर्मा जी. एम. आर वरलक्ष्मी फाऊंडेशन, वरोरा मा. श्रीमती ललिता चवरे कं. व्यवस्थापक आई.एफ. एफ. डी सी महाराष्ट्र यांनी सुद्धा सभासद शेतकरी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विठ्ठल कोसूरवार लेखापाल व प्रास्तविक श्री. आकाश खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व डायरेक्टर लभान सराड फार्मर्स प्रोडूसर कंपनी ली. खांबाडा यांनी परिश्रम घेतले व आई. एफ. एफ. डी. सी स्टाफ महाराष्ट्र यांनी सहकार्य केले. तसेच या सभेला परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते

Share News

More From Author

नेहरू विद्यालय शेगाव बूज येथे रक्षा बंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा Raksha Bandhan program celebrated with great enthusiasm at Nehru Vidyalaya Shegaon Bu

जि.प.शाळेतून संगणक चोरणाऱ्या माजी मुख्याध्यापक गेडामवर कारवाई करा Take action against ex-principal Gedam who stole computer from G.P. school

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *