कालबाह्य झालेल्या बस मृत्यूला देत आहेत निमंत्रण Outdated buses are inviting death

✒️ गजानन लांडगे यवतमाळ(Yavatmal प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.11 सप्टेंबर) :- जिल्ह्यातील बऱ्याच आगारांमध्ये आरटीओ यवतमाळ यांनी कालबाह्य एक्सपायर झालेल्या बसेसला पुन्हा रस्त्यावर धावण्याची परवानगी नाकारल्यामुळे जिल्ह्यात शेकडो बसेस प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर धावत आहेत .

ब्रेक फेल, बसच्या काचा फुटल्या आहेत, प्रवशायाच्या आंगवर पाणी टपकत आहे ,निकृष्ट टायरवर बस धावत आहे ,अश्या रोडवर चालत असलेल्या बसेसची तपासणी करून त्या बसवर कार्यवाही व जमा करावी अशी मागणी जगदीश भाऊ नरवाडे संस्थापक अध्यक्ष जन आंदोलन आधार संघर्ष समिती यांनी पंकज आशिया जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना केली आहे.

 उमरखेड एसटी महामंडळाच्या 44 बस पैकी बऱ्याचशा बसेस हे कालबाह्य असल्याचे कळते त्या बसेस गेल्या कित्येक महिन्यापासून रस्त्यावर बस प्रवाशांना मृत्यूलाा निमंत्रण देत धावत आहेत .

शासनाने अनेक योजना अंतर्गत गोरगरीब जनतेला बसमधून फुकट प्रवास असल्यामुळे महिलांची संख्या पूर्वीपेक्षा पटीत वाढली आहे त्यांचा प्रवास हा जीवघेणा ठरू शकतो .

त्यामुळे आपण नवीन बस ची तात्काळ वेवस्था करावी नवीन बस येईपर्यंत प्रवास थांबावा असा आदेश आपण प्रत्येक आगार प्रमुख यांना तात्काळ देण्यात यावे वरील सर्व घटनेस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ हे जबाबदार असल्याने यापुढे कुठलीही जीवित हानी झाल्यास त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा वरील भोंगळ कारभारावर बेजबाबदार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांचे सहकारी आरटीओ अधिकाऱ्यांवर आपण तात्काळ चौकशीचे आदेश देऊन योग्य ते कारवाई करून सर्वसामान्य जनतेचा जीव जाणार नाही याची आपण दक्षता घ्यावी वरील निवेदनाद्वारे सकोल चौकशी करून जिल्ह्यात रस्त्यावर धावणाऱ्या बसेस योग्य व अयोग्य किती आहेत याची तात्काळ माहिती द्यावी 

जिल्ह्यातील बरेच बस स्थानके ही अंधाराचा फायदा घेऊन रात्र भर दारू गांजा जुवा गुन्हेगारीचे तस्करांचे अड्डे तयार झाले आहे त्यावर कडक निर्बंध घालून समूहाने रात्रभर फिरणाऱ्यावर तात्काळ मोठी कारवाई करण्यात यावी .

कारवाई न केल्यास 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त आंदोलन करणार असल्याचे निवेदन द्वारे मागणी जगदीश भाऊ नरवाडे संस्थापक अध्यक्ष जन आंदोलन आधार संघर्ष समिती यांनी कलेक्टर यवतमाळ व विभागीय आयुक्त अमरावती मुख्य सचिव मुंबई यांना निवेदनाद्वारे केली आहे.