खुले बुद्धिबळ स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद Huge response to open chess tournament

Share News

▫️सार्थ भुजाडे ने जिंकली खुले बुद्धिबळ स्पर्धा(Sarth Bhujade won Open Chess Tournament)

✒️ आम्रपाली घातले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि .31 ऑगस्ट) :- क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर व इंडीयन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चंद्रपूर जिल्हा मधे खुले बुद्धिबळ स्पर्धा चे आयोजन दिनांक 27 आगष्ट 2023 ला आय.एम.ए.हॉल चंद्रपूर येथे घेण्यात आली. स्पर्धेत 112 स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

      खेळाडूंचा जास्त सराव होऊन यश संपादन करता यावे ही भूमिका ठेवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा एकत्र खेळवले असले तरी 2 विभागात विभागलेली होती. दोन्ही विभागात रोख पुरस्कार व ट्रॉफी देण्यात आले.प्रथम क्रमांक सार्थ भूजाडे, द्वितीय क्रमांक साहिल घोरघाटे,तृतीय क्रमांक हर्षित कष्टी, चतुर्थ क्रमांक तिरुपती संग्राम, पाचवा विनोद गवळी,सहावा सुयोग वरहाटे.

सातवा स्वप्नील पाटील तर 15 वर्षा खालील गटात प्रथम क्रमांक सार्थक वासेकर,द्वितीय अर्णव पेडिवार , तृतीय हेरंब निर्वाण, चतुर्थ अध्याय चहारे, पाचवा जिग्नेश आदिया यांना रोख रक्कम व ट्रॉफी मेडल प्रदान करण्यात आले.अंडर 19,17,13,11,9,7 मद्ये बेस्ट मुलगा व मुलगी यांना मेडल प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष श्री. आश्विन मुसळे यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजक व मुख्य आरबीटर मा. नरेन्द्र कन्नाके सर व कुमार कनकम सर यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका सहज पूर्ण केली. कार्यक्रमाला आयोजित करण्यास नरेंद्र कन्नाके (सहायक शिक्षक,नेहरू विद्यालय शेगाव बूज .)यांनी अथकपणे प्रयत्न केले. चंद्रपूर चे अध्यक्ष मा.आश्विन मुसळे सर,डॉ.के.गुलवाडे,डॉ. के साने, डॉ. बोबडे, सर्व उपस्थित पालक, कोच, या सर्वांनी अभिनंदन केलेले आहे.

Share News

More From Author

भद्रावती तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना भरीव आर्थिक मदत द्या Declare drought in Bhadravati taluka and provide substantial financial assistance to farmers

चंदनखेडा येथील सर्प मित्रांनी दिलं अजगर ला जीवदान Snake friends from Chandankheda gave life to python

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *