तांदूळ अवैध वाहतूकीत वरोरा बाजार समिती चा कोणताही संबंध नाही- डॉ. विजय देवतळे  Warora Bazar Committee has no connection with the illegal transport of rice – Dr. Vijay dewatle 

Share News

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.28 ऑगस्ट) :- शेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध तांदूळाच्या वाहतूकी मधील पकडलेल्या ट्रक च्या कारवाई मध्ये कृषि उत्पन्न बाजार समितीचा कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले असून ह्या प्रकरणाशी संबधीत माहिती पोलिस विभागाला पाहिजे होती ती संपूर्ण माहिती बाजार समितीकडून वेळेवरच देण्यात आली आहे.

सदर प्रकरणातील संबंधीत व्यापाऱ्याला माढेळी उपबाजार येथील गोदाम तत्कालीन सभापती राजेंद्र चिकटे यांचे कार्यकाळात किरायाने दिले असून मागील अनेक वर्षापासून धान्य खरेदीचे लायसन्सव्दारे संबंधीत व्यापारी धान्याची खरेदी सुध्दा करीत आहे. व सर्व खरेदी मालाचा सेस नियमीत बाजार समितीला भरत आहे. तसेच शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्याची सुध्दा नावे बाजार समितीच्या रेकॉर्डवर आहे. त्यामूळे संबंधीत व्यापाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे बाजार समिती सभापती डॉ. विजय देवतळे यांनी सांगितले.

       तरी देखील काही विरोधी सदस्य राजकारण करून स्वतःची पोळी भाजण्यासाठी बाजार समितीला व बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने वर्तमान पत्रामध्ये चूकीची व खोटी माहिती प्रसिध्द करण्याकरिता देण्यात आली. कर्यालयीन प्रमुखा कडून महिती न घेता खोटी माहिती वृत्तपत्रातून प्रसिध्द करणे चूकीचे असून बदनामी करीत आहे. 

       वस्तुस्थिती अशी आहे कि,. माढेळी उपबाजार बाजार समितीमधील तांदळाची खरेदी केलेली संपूर्ण माहिती शासनाला व पोलिस विभागाला देण्यात आली आहे.अजून काही माहिती शासनाला पाहिजे असेल तर जास्तीची माहिती समिति देईल असे सांगितले.

ह्या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध येत नाही. बाजार समिती स्थानिक स्वराज्य संस्था असून शेतमाल खरेदी विक्री व्यवहारामधून मिळणाऱ्या बाजार फि चे उत्पन्नातून विविध विकास कामे व ईतर खर्च करत असते. व बाजार समितीला शासनाचा कोणताही निधी येत नाही हि बाब संबंधीतांनी लक्षात घ्यावी व बाजार समितीची बदनामी करू नये असे अवाहन समितीचे सभापती डॉ. श्री. विजय रा. देवतळे, उपसभापती जयंत टेमुर्डे, सचिव चंद्रसेन शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

 ‘तो शासकिय तांदूळ नाही !-तहसीलदार 

सदर प्रकरणातील तांदूळ हा शासकिय व सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील नसल्याचा निर्वाळा अन्न पुरवठा अधिकारी तहसिल, वरोरा यांनी पोलिस स्टेशन शेगाव यांना अहवालाद्वारे दिला असल्याचे तहसीलदार यांनी लेखी पत्राद्वारे पोलीसांना कळविले आहे.

Share News

More From Author

भोसरीचे सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे महाराष्ट्र खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित Social activist Sandeep Rakshe of Bhosari honored with Maharashtra Khandesh Gaurav Award

व्यापाऱ्याला माझ्या कारकिर्दीत गोदाम भाड्याने दिले नाही माजी सभापती राजेंद्र चिकटे Former Speaker Rajendra Chikte did not rent a godown to a trader during my tenure

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *