✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.13 ऑगस्ट) :- तळोबी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सिंदेवाही – तळोधी रोडवर सावरगाव जवळ चिखलगाव येथील युवक प्रशांत नरेंद्र मेश्राम वय 23 वर्षे हा अपघातात ठार झाल्याची घटना दि,१२ ऑगस्ट सायंकाळला ८ वाजताच्या दरम्यान घडली.
मृतक युवक हा सावरगाव कडून चिखलगाव कडे आपली हिरो कंपनी ची दुचाकी क्रमांक एम एच 34 बी ई 0446 ने जात असताना अज्ञात वाहनाला धडक दिल्यामुळे दुचाकी स्वार प्रशांत रोडवर पडल्याने डोक्याला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्रावा मुळे घटनास्थळी ठार झाल्याचे निदर्शनास आले.
तळोधी बाळापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोयर यांनी घटनास्थळी जाऊन मोक्का पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता नागबीड येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
