पाचव्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य Financial assistance to the students of assembly area on the fifth day

Share News

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.31 जुलै) :- शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात “जनसेवा दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण आठवडाभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

आज (दि.३१) ला जनसेवा दिन सप्ताहाच्या पाचव्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत देण्यात आली.

वरोरा तालुक्यातील परसोळा येथील गुलशन कुमार मारोती मडावी हा विद्यार्थी पोद्दार कॉलेज, मुंबई येथे बी.ए.एम.एस. अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहे. त्याची घरची परिस्थिती जेमतेम आहे. बी.ए.एम.एस.चे शेवटचे वर्ष आहे. कॉलेजची फी भरायला आर्थिक अडचण आहे. ही बाब गुलशनच्या पालकांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. याची दखल घेवून गुलशनला अंतिम वर्षाची फी भरण्याकरिता आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी सौ. नर्मदाताई बोरकर जिल्हा महिला संघटीका चंद्रपूर, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, भास्करभाऊ ताजने उपजिल्हा प्रमुख, मंगेश उर्फ श्रीहरी भोयर विधानसभा संघटक, दत्ताभाऊ बोरकर तालुका प्रमुख वरोरा, नंदू पढाल तालुका प्रमुख भद्रावती, घनश्याम आस्वले, शहर प्रमुख भद्रावती, खेमराज कुरेकार शहर प्रमुख वरोरा,सुनिल मोरे, प्रशांत कारेकर शिवसैनिक माजी नगरसेवक भद्रावती, निखिल मांडवकर, अभिजित कुळे यांची उपस्थिती होती.

Share News

More From Author

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपुर ( ग्रामिण) ची कार्यकारनी जाहीर Announced by the executive of Maharashtra State Teachers Council District Chandrapur (Rural)

आष्टी परिसरात वाघिणीचा मृत्यू  Death of tigress in Ashti area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *