बर्ड मॅन पक्षी मित्र सुमेध वाघमारे उद्या सह्याद्री वाहिनीवर Bird Man Prakshi Mitra Sumedh Waghmare tomorrow on Sahyadri channel

Share News

▫️कला अकादमी व पत्रकार संघाच्या वतीने च्या रवींद्र तिराणिक यांनी केले अभिनंदन(Ravindra Tiranik congratulated on behalf of Kala Academy and Journalists Association)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.28 जुलै) :- पक्षी मित्र म्हणून ज्याची अख्ख्या महाराष्ट्रात ओळख आहे. पर्यावरणात सातत्याने पक्ष्यांचा अभ्यास करून वन पर्यावरणात रमून. जंगलात भ्रमण करून सर्व विविध नाविन्यपूर्ण पक्ष्यांची आवाज काढण्याची कला सुमेध यांनी अंगीकृत केली आहे .

पर्यावरण प्रेमी पक्षीमित्र ‘बर्ड मॅन’ सुमेध वाघमारे यांची नाविन्यपूर्ण विविध पक्षांचे स्वतः आपल्या कंठातून काढण्याच्या शैलीची( कलात्मक स्वरांची)आवाजाची दखल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने घेतली असून सदर कार्यक्रम शनिवार दिनांक २९जुलै २०२३ला सायंकाळी ७:३० वाजता/ रात्री १०.००वाजता आणि रविवारी दिनांक ३० जुलै २०२३ ला दुपारी ०१.३०वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनी वरून थेट प्रसारित होणार आहे.

त्यांच्या नावीन्यपूर्ण पक्षी प्रेम व पक्ष्यांची आवाज काढण्याची कलात्मक शैली अभिनव असून विविध बालकलावंत व विद्यार्थ्यांना दिशादर्शक आहे. चंद्रपूर कलाअकादमी संचालक व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी पक्षी मित्र सुमेध वाघमारे यांचे अभिनंदन केले असून, सदर कार्यक्रम बाल शालेय -महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांनी आवर्जून बघावा असे आव्हान कलाअकादमी चंद्रपूर ने केले आहे.

Share News

More From Author

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा २७ जुलै हा वाढदिवस ‘जनसेवा दीन’ म्हणून दरवर्षी साजरा करू : रविंद्र शिंदे We will celebrate Shiv Sena chief Uddhav Balasaheb Thackeray’s birthday on July 27 as ‘Janseva Din’ every year: Ravindra Shinde

गीरसावळी ते गीरसावळी पाटी रस्त्यासाठी तहसीलदारांना साकडे Sacade to Tehsildar for Girsawli to Girsawli Pati road

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *