साहेब वाहन पार्क करायचे कुठे?  Sir, where to park the vehicle?

Share News

🔹वाहनधारकांचा प्रशासनाला सवाल(Question of the vehicle owners to the administration)

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.5 जुलै) :- वरोरा तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून शेगाव ची ओळख आहे, शेगावची लोकसंख्या दहा हजार च्या वर असून या ठिकाणी सोमवारला मोठा आठवडी बाजार भरत असून जवळपासचे 70 ते 80 गावातील नागरिक, बाजारामध्ये येत असतात परंतु या ठिकाणी नागरिकांना व दुकानदारांना वाहन पार्क करण्याकरीता जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणीच्या सामना करावा लागत आहे..

याठिकाणी मुख्य रस्त्यावर किराणा दुकान,कपड्याची दुकान, हार्डवेअर, जनरल दुकान, पुस्तके कृषी केंद्र, नाश्ता, जूते,फ्रुट, दुकाने,भाजीपाला, फळे दुकाने,फुलाची दुकान इतर दुकाने असून याच रस्त्यावर दवाखाना व फार्मसी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पेशंटला तसेच ग्राहकांना अरुंद रस्त्यामुळे वाहन पार्क करायचा कुठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे..

शेगाव मध्ये नेहरू विद्यालय कडे जाणारा रस्ता, सरकारी दवाखान्याकडे जाणार रस्ता, तसेच गुजरी भरण्याचे ठिकाण, इंडियन बँककडे जाणारा रस्ता,या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वाहतूक सुरू राहते रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूला वाहन उभे राहत असल्याने दुकानदारासहित ग्राहकांना, जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे असल्याने या ठिकाणी ग्राहकाकरीता वाहन उभी करण्याकरीता कुठले प्रकारची जागा नसून ठीक ठिकाणी वाहन उभी ठेवल्या जात असते .

त्यामुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनास अडचणी निर्माण होत असून सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वरोरा, चिमूर 353 राज्य मार्गावर दोन्ही बाजूला वाहने उभी करण्याकरीता नागरिकांना आसरा घ्यावा लागत असून काही नागरिकांना पेट्रोल पंपच्या पटांगणामध्ये पार्किंग म्हणून गाडी लावत असतात….

Share News

More From Author

वरोरा येन्सा येथे स्व: खा.बाळु धानोरकर जयंती निमित्य रक्तदान शिबिर  Self : Mr. Balu Dhanorkar Jayanti Blood Donation Camp at warora Yensa

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे माननिय स्व.बाळभाऊ धानोरकर माजी खासदार यांच्या जयंतीनिमित्त मा.आमदार व श्रिमति प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या कळून रुग्णांना फळवाटचा कार्यक्रम घेण्यात आला On the occasion of the birth anniversary of Hon’ble Balbhau Dhanorkar former MP at Upazila Hospital Warora, Hon’ble Amdar and With the knowledge of Mrs. Pratibha and Balubhau Dhanorkar, a fruit distribution program was conducted for the patients

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *