अवैध वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली A tractor trolley loaded with illegal sand overturned

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.2 जुलै) :- येथील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक थांबण्याचे नाव घेत नाही. आष्टा येथून दिवसाढवळ्या वाळूचे उत्खनन सुरू झाले आहे. नियोजित ठिकाणी अवैध वाळू रिकामी करत असताना ट्रॉली उलटली, त्यामुळे दुचाकीचा चक्काचूर झाली.

शेगाव (बु) मंडळात वाळूची लिलाव नाही. अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का? गावातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या जामा मशिदीसमोर हा अपघात झाला.

दिवसभर येथे लोकांची गर्दी असते. मोठी दुर्घटना घडू शकली असती.

 शेगांव (बु) येथे वाळू तस्करी ही मोठी डोकेदुखी बनल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.वाळू तस्करांना प्रशासनाचा धाक राहिलेला नाही.

दिवसाढवळ्या गावाच्या मध्यभागातून वाळूची तस्करी होत आहे. मोठ्या अपघाताला निमंत्रण.

मिळालेल्या माहितीनुसार, नजीकच्या नदी नाल्यांतून अवैध वाळू भरून ट्रॅक्टर मुख्य बाजारमार्गे शेगाव (बु)कडे येत होता. त्यानंतर जामा मशीद चौकाजवळ ट्रॉली अनियंत्रितपणे उलटली.

Share News

More From Author

राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, शोभाताई फडणवीस यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन Inauguration of health camp in presence of President of National OBC Commission Hansraj Ahir, Shobhatai Fadnavis

सिकलसेल आजारा विषयी जनजागृती Awareness about sickle cell disease

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *