आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत Welcome to new students at Anand Madhyamik Vidyalaya Anandvan

Share News

🔸आनंदवनातील प्रमुख रस्त्यांनी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली(A morning procession of students was taken out on the main roads of Anandavan)

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.1 जुलै) :- आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे शाळेच्या पहिल्या दिवशी वर्ग नववी व दहावीत नाव नोंदणी करणाऱ्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत तथा अभिनंदन करून त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला.नवीनच प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदोत्सव दिसून आला.प्रवेशित विद्यार्थ्यांनी आम्ही रोज शाळेत येऊ अशी ग्वाही दिली.विद्यार्थ्यांचे ओक्षवंत व स्वागत झाल्यानंतर आनंदवनातील प्रमुख रस्त्यावरून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.विद्यार्थ्यांच्या शाळेत चला,शाळेत चला, अक्षराची ओळख करून घेऊ या,भारत माता की जय या घोषणेने अख्खे आनंदवन परिसर दुमदुमले होते.

     विद्यार्थ्यांच्या स्वागत संभारंभ कार्यक्रमाला महारोगी सेवा समितीचे विश्वस्त तथा शाळा व्यवस्थापन समितीवर उपाध्यक्ष सुधाकर कडू सर, शाळा व्यवस्थापन समितीच्या कोषाध्यक्षा सारिका सौसागडे मॅडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.उपस्थित मान्यवर तथा 

मुख्याध्यापिका विद्या गोखरे(टोंगे) यांच्यासह शाळेच्या शिक्षकवृंदानी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Share News

More From Author

शाळापुर्व तयारी मेळावा Get ready before school

कृषी दिनी महिला शेतकऱ्याचा सत्कार Honoring women farmers on Agriculture Day

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *