शाळापुर्व तयारी मेळावा Get ready before school

Share News

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.1 जुलै) :- जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा येथे वर्ग १ ली तील नवप्रवेशित विद्यार्थी तथा पालकांसाठी दुसरा शाळापुर्व तयारी मेळावा २०२३ घेण्यात आला.

 याप्रसंगी उद्घाटक म्हणून गावाचे सरपंच मा.नयन जांभुळे,मुख्य उपस्थिती मा.भारती उरकांडे उपसरपंच,मा.अनिल कोकुडे,अध्यक्ष शा.व्य.स, मा.अनिता आईंचवार मु.अ.तथा सर्व शिक्षक,पालक वर्गाची उपस्थिती होती.

       या मेळाव्यात ७ प्रकारच्या दालनावरुन चिमुकल्या विद्यार्थी व पालकांना, शिक्षक व अंगणवाडी स्वयंसेविकाकडून कृतीशिलतेतून उद्बोधीत करण्यात आले.

यावेळी मागिल मेळाव्यात घेतलेल्या कृतीत आश्वासक प्रगती दिसून आली.विशेष कार्य करणा-या पालकांचे अभिनंदन करण्यात आले.सर्व विद्यार्थी उत्तम प्रतिसाद देत होते.जवळपास सर्वंच विद्यार्थ्यांचे पालक सदर मेळाव्यास उपस्थित होते.

     एकंदरित मेळावा आनंदात पार पडला.

Share News

More From Author

समय टोंगे चा नीट परीक्षेतील नेत्रदिपक  यश प्राप्त केल्याबद्दल सत्कार Samay Tonge felicitated for his spectacular success in the NEET examination

आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत Welcome to new students at Anand Madhyamik Vidyalaya Anandvan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *