माऊंट कॉन्व्हेंट अँण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स मूल, च्या मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी व शैक्षणिक मंत्रीमंडळ शपथ विधी व सत्कार सोहळा  Mount Convent and Jr. College of Science Mool, student representative and academic cabinet swearing-in ceremony and felicitation ceremony

✒️ मूल (Mul विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क)

मूल (दि.17 जुलै) :- दिनांक १५ जुलै २०२३ रोज शनिवारला माऊंट कॉन्व्हेंट अँण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स मूल मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी व शै.मंत्रीमंडळ शपथ विधी व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला भाऊराव झाडे अध्यक्ष दिशा फाउंडेशन चंद्रपूर, शैलेश झाडे संचालक दिशा फाउंडेशन चंद्रपूर.

मुख्याध्यापक रीमा कांबळे,उपमुख्याध्यापक अशपाक सय्यद ,क. महा.प्रभारी दुष्शांत गणवीर उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी ओम राखडे व विद्यार्थीनी प्रतिनिधी जानवी वासेकर, पलक चावला, गौरी गौंड्रलवार, खुशी पाउलबुद्धे, वेदांत चापडे, किमया खोब्रागडे ,शौर्य माकोडे यांची शै.मंत्रीमंडळ पदी नियुक्ती झाली.

नृत्य व मुकनाट्याद्वारे विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यात आले.नियुक्त झालेल्या सर्व मंत्र्यांचा शपथ विधी व सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला व त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुपेंद्र मोटघरे व आभार प्रदर्शन सुनिता भेंडारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.