श्री अभय धोबे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती Appointment of Mr. Abhay Dhobe as District Vice President

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.10 जुलै) :- येथून जवळच असलेल्या चारगाव खुर्द येथील युवा कार्यकर्ते श्री अभय धोबे हे प्रत्येक तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकरीता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस पक्षाचे माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार, असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील शिंदे, यांच्या मार्गदर्शनात अभय धोबे चारगाव खुर्द यांची असंघटित कामगार, कर्मचारी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली आहे..

  विभिन्न क्षेत्रातील असंघटित कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व असंघटित कामगारांना काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणाशी विचार जोडून पक्ष मजबूत करण्याकरीता बळ तालुक्यातील गावात मिळेल, त्यांच्या या नियुक्ती करीता सहकार्य भद्रावती, वरोरा क्षेत्राचे आमदार प्रतिभा धानोकर यांचे लाभले असुन यावेळी उपस्थित संदीप सिडाम जिल्हाध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस, विजय धोबे उपाध्यक्ष शहर काँग्रेस, आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

        तर श्री अभय धोबे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने येथील आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर तसेच येथील सरपंच तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री राजेंद्र नथ्थूजी चिकटे , तसेच देवेंद्र खाडे, प्रमोद आवारी इत्यादींनी पुष्पगुच्छ देऊन देऊन अभिनंदन केले तसेच पुढील वाटचाली करिता शुभेच्छा प्रदान केल्या..