कलर्स मराठी वरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपूर दमदार भूमिकेत Ashu Surpur in a powerful role in Kasturi serial on Colors Marathi

76

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.26 जून) :- सोमवार दिनांक 26 जुन 2023 पासून रात्री साडेदहा वाजता नव्याने सुरू होत असलेल्या कस्तुरी या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आशु सुरपूर ही एका महत्त्वाच्या भूमिका मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या मालिकेमध्ये तिच्यासोबत शिल्पा कुलकर्णी यांची भूमिका असून या मालिकेचे दिग्दर्शक श्री दीपक नलावडे आहेत. 

आज पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपण तिला पाहिलेले आहे. या मालिकेच्या निमित्ताने गप्पा मारत असताना आपण स्वकष्टाने आतापर्यंत जवळपास 20 मालिकांमध्येही अभिनयाचा प्रवास पूर्ण केल्याचे तिने सांगितले. कोविडच्या कालावधीमध्ये अचानक झालेल्या आईच्या निधनामुळे ती पूर्ण खचून गेली होती. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा आगमन करण्यासाठी कस्तुरी मालिकेचे कार्यकारी निर्माते श्री सुनील कुलकर्णी यांनी दिलेली संधी तिने स्वीकारली. त्याबद्दल ती त्यांचे आभारही मानते. 

“सुरुवात छोटी असली तरी चालेल, मोठे होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे असते”. असे मत व्यक्त करून आभिनेञि आशु सुरपूर हिने तिच्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्या प्रेक्षकांना ही मालिका बघण्याचे आवाहन केले आहे. पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी मुलाखत घेतली 

तमाम मीडिया तर्फे पुढील वाटचालीसाठी आशु सुरपूर हिला भरपूर शुभेच्छा.

https://smitdigitalmedia.com/