आंबेडकरपुत्र संदेश आंबेडकरांच्या नेतृत्वात संविधान आरपीआय सज्ज.(डॉ. माकणीकर यांची माहिती) Under the leadership of Ambedkar’s son Sandesh Ambedkar, the Constitution RPI is ready (Information by Dr. Maknikar).

Share News

✒️ सुनिल भोसले मुंबई(Mumbai प्रतिनिधी)

मुंबई (दि.29 जून) :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष युवा अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या संदेश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सज्ज असल्याचे मत पक्षाचे राष्ट्रीय महासचिंव डॉ. राजन माकणीकर यांनी सांगितले.

आंबेडकरी विचार व वंशाचे वारसदार, परखड स्वाभिमानी बाना, संयमी व शान्त स्वभावाचे पण तितकेच निर्भीड असलेले Son Of Ambedkar. आंबेडकर घराण्याचे सुपुत्र डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला पक्ष उभारून गढूळ राजकारण शुद्ध करण्याच्या उद्देशाने प्रवाहात येत असल्याची माहिती विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.

तरुणांवर आलेली बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचे झालेले व्यापारीकरणं, बहुजनांवरील जातीय अत्याचार, बौद्ध व मातंगा वरील जीवघेणे हल्ले थांबण्यासाठी भारतीय संविधान आणी लोकशाही टिकवण्यासाठी आंबेडकर पुत्र राजकारणात उतरून अमूलग्रा बदल घडवतील असा आशावाद ही पॅन्थर राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

भारतीय संविधान माध्यमिक शालांत अभ्यासक्रमात शिकवणीसाठी घेण्यात यावे यासाठी आम्ही मागील 10 ते 12 वर्षांपासून चालवलेला संविधानिक लढ्याला मा. संदेश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामुळे अधिक बळ व गती येऊन सरकारला आमची मागणी मान्य करवून घेण्यास लवकरच यशस्वी होण्यावाचून कोणी रोखणार नाही अशी ग्वाही ही डॉ. माकणीकर यांनी दिली.

Share News

More From Author

आरोग्य केंद्राच्या इमारतीला पडल्या भेगा, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता Cracks in health center building, shortage of health workers

सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज आस्वले यांनी घेतली वयाच्या ७४ व्या वर्षी समाजशास्त्र विषयात पदवी Social worker Prof. Dhanraj Aswale graduated in Sociology at the age of 74

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *