खांबाडा येथील कंत्राटी विज कामगाराचा करंट लागून मृत्यू  A contract electricity worker in Khambada died due to electrocution

Share News

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी) 

वरोरा (दि.28 जून) :- तालुक्यातील खांबाडा येथील कंत्राटी कामगार म्हणून गेल्या ४ वर्षा पासून सतीश चिंधुजी तोडासे वय २२ वर्ष हा कंत्राटी कामगार म्हणून खांबाडा येथील महावितरणमध्ये काम करत होता.

आज तो लाईन चे काम करायचे आहे म्हणून डीपी चा सप्लाय बंद करून, खाबावर चढला आणी त्याला विजेचा शॉक लागून खांबावरून पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. साय ५.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. ही बातमी वाऱ्या सारखी पसरताच नागरिकांनीघटनास्थळी एकच गर्दी केली होती.

महावितरण चे कर्मचारी व इंजीनियर घटना स्थळी पोहचून ज्या जागेवर घटना घडली त्या जागेची पाहणी केली. वरोरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणी त्याची चमू घटनास्थळी पंचनामा करून बॉडी ला ताब्यात घेऊन शवविछेदना साठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवली.

मृत कुटुंबाला महावितरण कडून २० हजार ची मदत कॅश स्वरूपात घरच्यांना देण्यात आली. उर्वरित ३ लाख ८० हजार चेक स्वरूपात देण्यात येईल असे आश्वासन महावितरन चे इंजिनियर भोयर यांनी घरच्यांना दिले. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

Share News

More From Author

बुद्धिजीवीनि समाजाच्या उद्घनासाठी कार्य करावे. प्रा. संजय बोधे. Work for the opening of intellectual society..Prof. Sanjay Bodhe.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच आदिवासी जिल्ह्यात येत असल्याबद्दल बालचित्रकार प्रांजली तिराणिकने साकारले चित्र Child illustrator Pranjali Tiranik depicts President Draupadi Murmu visiting tribal district for the first time

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *