कत्तलीसाठी नेणाऱ्या 14 जनावरांची सूटका Exemption of 14 animals for slaughter

Share News

🔸पडोली पोलिसांची कारवाई : पाच आरोपी अटक (Padoli police action: Five accused arrested)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.6 जून) : – पिकअप वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या १४ जनावरांची सुटका करुन पडोली पोलिसांनी दोघांना अटक केली. मंगळवार ला सकाळी देवाळा गावा जवळ नाकाबंदी करुन पोलिसांनी ही कारवाई केली.

अब्दुल करीम कुरेशी ( ४४), अब्दुल नईम शेख (२१), इमरान सयद कुरेशी (३१), मो. जावेद कुरेशी (२६), रां तुकुम तलाव चंद्रपूर ,सदीप रामचंद आबीलकर (४५) रा. अजयपुर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर १ फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या कारवाईत सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पडोली पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी लगेच देवाला गावा जवळ येथे नाकाबंदी केली. दरम्यान २ संशयित वाहन पिकअप येताच पोलिसांनी वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात जनावरे कोंबून दिसून आले. पोलिसांनी वाहनचालक व वाहक या अटक केली तर सोबतच एकजण पोलिसांना पाहून फरार झाला.

पोलिसांनी जनावरांसह ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात प्रकाश निखाडे, कैलास ख्रोब्रागडे, किशोर वाकाटे, सुमीत बरडे, प्रतिक हेमके, पकंज किटे, धिरज भोयर, कोमल मोहजे यांच्यासह पडोली पोलिसांच्या चमूने केली.

Share News

More From Author

महावितरण चा भोंगळ कारभार Poor management of Mahavitran

शेतकरी संघटना आणि राजकारण Farmers’ Organizations and Politics

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *