यळकोट यळकोट च्या गजरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti celebrated in Yalkot Yalkot

Share News

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.6 जून) :- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा च्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

 त्यावेळी महाराणी अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, अजिंक्ययोद्धा यशवंतराव होळकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणा देण्यात आला.

त्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डाँ. प्रफुल खुजे, ऍड अनिल ढोले सर, अशोक वैद्य, बरडे मॅडम, सोनुताई येवले स्वाती खराबे मॅडम, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन संगीता संजय बोधे मॅडम, प्रास्ताविक इंजि. आशिष मोंढे, आभार प्रदर्शन इंजि. गणेश चिडे यांनी केले.

त्यावेळी राजश्री वैद्य या युवा कन्येने उत्कृष्ट कुशलसंघटक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास मांडला.

 तसेच सामाजिक कार्यकर्ते मुकेश जिवतोडे, किशोर भोयर, चुकुंबे सर, रोकडे सर यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.

राजमाता अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रमात अनाथ लोकांना स्नेहभोजन दिले.

तसेच बरडे मॅडम गव्हर्नमेंट हॉस्पिटल वरोरा यांच्या कडून पत्रकार प्रविण मुधोळकर यांना अहिल्यादेवी होळकर सन्मान चिन्ह देण्यात आले.

त्यावेळी प्राध्यापक संजय बोधे, डाँ सरवदे, गजानन शेळकी, पंडित लोंढे, पंढरी बारतीने, जिवतोडे, अजिंक्य काळे, आशिष शेळकी, योगीराज चामाटे, मुरलीधर शेळकी, सचिन चिडे, राकेश टापरे, अमोल काळे, अक्षय झिले, अरुण चिडे, विजय धवणे, श्रीकृष्ण धवणे, ज्ञानेश्वर झिले, रवींद्र गावंडे, संदीप चिडे, मुंगलं सर, धवणे सर, दिनेश मसाडे, प्रज्वल शेळकी, रोहन चिडे यांनी सहकार्य केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीला समस्त धनगर समाज बांधव, अहिल्याभक्त, शिवभक्त, संयुक्त समाज बांधव उपस्थित होते.

Share News

More From Author

रात्रकालीन गांव बैठका:-तालुका कृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम Night Village Meetings:-Innovative activities of Taluka Agriculture Department

महावितरण चा भोंगळ कारभार Poor management of Mahavitran

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *