आनंदवनातील दिव्यांग मुलांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली Children with disabilities in Anandavan maintained the tradition of 100 percent results

Share News

✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.2 जून) : – महारोगी सेवा समिती वरोरा संचालित निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगांची कर्मशाला, आनंदवन येथे दिव्यांग व्यक्तिना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या दोन दशकाहून अधिक कालावधी पासून बोर्डाच्या खाजगी विद्यार्थी परीक्षा योजने अंतर्गत (17no. फॉर्म) दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेला बसविले जाते.

सदर विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी सुविधे सह नियमित शिकवणी वर्ग ही घेतले जाते. यावर्षी 20 कर्णबधिर व 12 अंध असे एकूण 32 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली .परीक्षेला बसलेल्या 32 पैकी 27 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 5 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे 18 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांहून अधिक गुण घेतले. यात कू. साक्षी डोईफोडे या कर्णबधिर विद्यार्थिनीने 82.20 टक्के गुण मिळवित प्रथम स्थान पटकावले तर कू. नीलाक्षी गद्देवार या अंध विद्यार्थिनीने 72.20 टक्के गुण मिळवित अंध प्रवर्गात प्रथम क्रमांक घेतला.

  व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांचे नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात दहावी परीक्षा समन्वयक गणेश जायनाकर, प्रकल्प समन्वयक व विषय शिक्षक इकृमुद्दिन पटेल, रमेश बोपचे, आशीष येटे, सौरभ वानखेडे ( कर्णबधिर शिक्षक)या शिक्षकांसोबत विजय भसारकर, मुख्याध्यापक, आनंद मूकबधिर विद्यालय, विशेष शिक्षक उमेश घुलॅक्षे, प्रशांत गवई, कला शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली. परीक्षा व पूर्व तयारी करीता नवले सर, मुख्याध्यापक , राखे सर,यांचे सह लोकमान्य विद्यालय, वरोरा येथील शिक्षकांचे बहुमोल योगदान व मार्गदर्शन प्राप्त झाले.

सदर यशा करीता संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे, संस्थंतर्गत व्यवस्थापिका पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, विश्वस्त, सुधाकर कडू , सदाशिव ताजने, माधव कवीश्वर यादी मान्यवरांसह आनंदवन वासियानी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन केले.. पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

Share News

More From Author

अभिनेत्री आशु सुरपुर ही दिसनार नविन भुमिकेत Actress Ashu Surpur is seen in a new role

भवानजीभाई चव्हाण विद्यालयाचा वर्ग 10 विचा निकाल 91.43 टक्के Bhawanjibhai Chavan Vidyalaya Class 10 result 91.43 percent

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *